"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान "

0

"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान "
हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष्टी मोठी नसेल परंतू अलिकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिले, तर कुठ्ल्याही साहित्य संमेलनातील वरिल विषयाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. काय हा परिसंवादाचा विषय होऊ शकत नाही? महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व आपले योगदान, तो महासत्ता कसा होईल याविषयी का चर्चा केली जात नाही? संमेलनातून सामान्य व्यक्तिला देशाच्या विकासाबद्दल काही मार्गदर्शन मिळायला हवे. मला असे वाटते की इतर कुठल्याही विषयापेक्षा आज सर्वात जास्त आवश्यकता या विषयाची आहे.देशाची अंतर्गत सुरक्षा, आंतरराष्ट्रीय सीमांचे प्रश्न, अखंडता यावर मार्गदर्शन मिळायला हवे. सुशिक्षित,सुसंस्कृत, सारस्वतांची ती जबाबदारी आहे. ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
काश्मिर भारतापासून वेगळॆ करण्याच्या एकमेव उद्देशाने काश्मिरातील फुटिरतावाद्यांनी देशाची राजधानी दिल्लीत "आझादी-द ओन्ली वे" या नावाने बिनबोभाट कार्यक्रम घेतला.अर्थात त्यांचा हेतू वेळीच ओळखून कश्मिरी पंडितांनी त्याला चोख उत्तर दिले.पण दु:ख याचेच वाटते की देश तोडायच्या चर्चा राजधानीत होतात आणि आपण देशाचे सुशिक्षित नागरिक राष्ट्रविकासा बद्दल अवाक्षरही काढत नाही.
आपल्या राष्ट्रियत्वाच्या भावनेला झालेय तरी काय ? तिला अशी मरगळ का आलीय ? ही मरगळ दूर करण्याची इच्छाशक्तीच आपल्यात नाही का ? मला वाटते सर्वांनी हे प्रश्न स्वत:शी एकदा तरी विचारावेत व प्रामाणिकपणॆ आतला आवाज ऎकावा. हीच माफक अपेक्षा.
आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर येणारया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा विषय येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. ही विनंती.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!