लिमीटेड प्रेम

0
 

प्रेम असाव दिव्यासारख
स्वत: जळून इतराना प्रकाश देणार
कसलीही अपेक्षा न करता
आपल्यासाठी राबनारया आईच्या मायेसारख


आकर्षण हेच प्रेम समजणा-या व टाईम पास म्हणून एका दिवसापुरता साजरा करणा-या प्रेमवीरांचा दिवस शुक्रवारी आहे. सध्याचा काळ नौटंकी करणाऱ्यांचा असल्याने प्रेमासारख्या उत्कट भावनाही फेशनच्या बाजारात कवडीमोल ठरत आहे.आपले जगणे कृत्रिम होत जात असल्याचे हे महत्वाचे निदर्शक आहे. नेहमी इतरांचे बघून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नैसर्गिक आनंद शोधणे व जगणे निरर्थक वाटत आहे. मला खरेच आनंद मिळतो की. इतरांना दाखावाण्यासाठी,प्रतिष्ठा जपण्यासाठी मी हे करत आहे असा विचार फारसा कोणी करत असल्याचे दिसत नाही. अन्यथा न शोभणारे फेशन त्यांनी स्वीकारले नसते. असाच एक फेशन म्हणजे व्हेलेनटाईन डे.
प्रेम म्हणजे त्याग, समर्पण असे म्हणणे म्हणजे धाडसाचे ठरावे. हे निरीक्षण बहुतांश युवक वर्गासंदर्भात आहे.जे  १४ फेब्रुवारी ला प्रेम दिवस साजरा करतात त्यांच्याबाबतीत तरी किमान हे खरे असावे.        
बॉलीवूड मधील नायक-नायिका प्रेमाचा अभिनय करतात ते चित्रपटात, परंतु त्यापासून प्रेरणा घेऊन आजचे प्रेमवीर प्रत्यक्ष जीवनात प्रेमाचा अभिनय करतात. कारण असे नसते तर कपडे बदलावे तसे गर्लफ्रेंड-बोयफ्रेंड बदलले गेले नसते. लैंगिक आकर्षण संपले की नाते संपले नसते. थोडासाही अपेक्षा भंग झाला की टोकाचे वादाविवाद झाले नसते. 
वास्तविक पाहता निर्मळ, निर्व्याज प्रेमात बांधिलकी, विश्वास यांचा भक्कम पाया असतो. परस्परांच्या जमेच्या बाजू आणि कमतरता अधिक चांगल्या पध्दतीने समजून त्यासह स्वीकारणे असते. यामुळेच प्रेम विवाह हा सहजीवनाचा सर्वोत्कृष्ट आनंद देणारा असणे अपेक्षित आहे.परंतु अनेक ठीकाणी प्रेम विवाहाचे रुपांतर लवकरच घटस्फोटात होते. याची अनेक कारणे असतीलही पण नाते उसवण्यापर्यंत चा प्रवास प्रेमाचा अभिनय असल्याने होतो हे मात्र नक्की. अर्थात हे दोन्ही बाजूंकडून अपेक्षित आहे.
खरे प्रेम विना मोबदला द्यायला शिकवते, मग असे प्रेम एखाद्या व्यक्तीवर असो, तत्वांवर असो अथवा देशावर असो. त्यात मिळवणे खूप कमी असते.याउलट प्रेमाचा अभिनय हिसकावून घेउन कृत्रिम आनंद मिळवत असतो.  असा कृत्रिम आनंद  मिळवण्यासाठीचे प्रोत्साहन १४ फेब्रु. सारख्या दिवसातून मिळते.
कदाचित या लिखाणाला प्रतिगामी वगैरे म्हणतील. परंतु ज्यानी किमान एकदा तरी

या जन्मावर, या जगण्यावर खरे प्रेम केले आहे त्याना हे खात्रीने पटेल. म्हणून असे वाटते की यापद्धतीने अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्या प्रेमाखातर काही त्याग करायला द्यायला शिकलो तर व्हेलेनटाईन डे सारख्या फेशन ची गरजा भासणार नाही.       

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!