ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू .....

0

ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू .....
देशाच्या व विशेषत: राज्याच्या राजकारणात धृवपदी असलेल्या हिंदूहृदय सम्राट यांच्या जीवनावरील 
प्रदर्शित झाला अन दोन दिग्गज प्रेक्षकांमधला संवाद दस्तुरखुद्दांच्या कानी पडला.
फोनची बेल वाजली (तुतारीचा आवाज) होता.
बेल ऐकून क्षणभर छान वाटले अन रिसीव्ह केला.
पलिकडून : (‘जय महाराष्ट्र’ असे मनातल्या मनात म्हणून) कुठे आहात सध्या ?
असे बोलणे एका कोकणस्थ व्यक्तीस लगेच कळते त्यामुळे अत्यंत क्रोधाविष्ट होऊन (वास्तविक चवताळून) त्यांनी प्रतिप्रश्न केला.
कोकणचो माणूस : सिंच्या, माका इचारणारा तू कोण हैस ? मी कोणत्याही पक्षात जाईन.
(समजावणीच्या सुरात) साहेब माझ्या बाहुतील बळ कमी झाले म्हणून माझा नंबर पण सेव्ह नाही 
केला तुमी ? हे बरोबर नाही. आणि तुमी मुंबईत आहेत का अस विचारलं ?
कोकणचो माणूस :  तुमी असा व्हय. बोला की मग. काय काम काढले ? एक गोष्ट अगोदरच सांगतो मी तुमच्या आघाडीत येऊ शकत नाय.
पलीकडून : ते जाउद्या हो. अगोदर एक सांगा पिक्चर पाह्यला का ?
(ते बहुधा निवृतीच्या विचार करत असून आपल्यालाही तसाच सल्ला देत आहेत असे समजून टिपिकल स्टाईल मंधे )
कोकणचो माणूस : आता पिक्चर कसले बघता? आणखी रिटायर्ड नाय झालो आपण .
पलीकडून : (हलक्या आवाजात) अहो साहेबांवर पिक्चर आलाय. तो म्हणतोय.
(कोकणचो माणूस दिलदार असल्याने लगेच भावूक होत.)
कोकणचो माणूस : माका पण लै आठवण येते हो साहेबांची. पण काय करू.
(या हृदयीच्या भावना  (कळ नव्हे) त्या हृदयी पोहोचल्याने आनंदी होत)  
पलीकडून : म्हणूनच फोन केला. चलायचे का ?  
कोकणचो माणूस : आता थेटरात जाणे नाय जमणार.
(कोकणचो माणूस आहेच दिलदार त्यामुळे एकदम नॉस्टल्जिक वगैरे होत )
कसले भारी दिवस होते ते ? काय दरारा होता साहेबांचा?
पलीकडून : साहेबांच्या बोलण्यात एक करिष्मा असायचा. आपल्याला घडवल सायेबानी.
कोकणचो माणूस : जेव्हा लाखोंच्या सभेत हात उंचावून साहेब बोलायचे न ‘माझ्या तमाम हिंदू 
बंधूभगिनीनो ’ तेव्हा अंगावर काटा यायचा. आपुन तेव्हा सायेबांच्या बाजूच्या खुर्चीवर असायचो.
(एकदम भारी फील करत म्हणजे दोन्ही बाहूत हत्तीच बळ आल्यासारखे )
पलीकडून : अहो आपण दोघांनी आंदोलनात किती वेळा खळ खटयाक केले.
कोकणचो माणूस : हो ना. पण आता त्या फक्त आठवणी. ती मजाच वेगळी होती.  
(एक लांब सुस्कारा सोडल्याचा आवाज आला अन ‘जिंदगी मे अगर रिवाइंड का बटन होता तो’ हे
हिंदी पिक्चर मधले वाक्य आठवले.)
पलीकडून : मी तर किती सोसले अन अजूनही सोसतोय.
(कोकणचो माणूस पण परत एकवेळ भावूक झाला.)
कोकणचो माणूस : मला पण लै त्रास होतोय. पण बोलणार कुठे? आजकालचा हा मिडीया लै 
बेक्कार. 
सिंचे माझ्या मागे बूम घेऊन फिरतात. मला स्वप्नात पण बूम दिसतो.
(अत्यंत त्रासिक होऊन )
पलीकडून : मी तर स्वप्न पाहणे सोडले आहे. पण काहीही म्हणा आपण दोघे तिथे एकत्र असतो तर 
जाम भारी वाटले असते. म्हणून म्हणले कमीत कमी एकत्र पिक्चर तर बघू.
कोकणचो माणूस : बघू की. (एकदम सावरत) पण आपल्या बंगल्यावर या. बाहेर नको. पिक्चर 
बघताना पडद्यावर साहेबांची दमदार एन्ट्री झाली अन एकदम ‘अरे आवाज कुणाचा ’ अशी घोषणा 
कोणी दिली  तर आपल्याला राहवणार नाय.
पलीकडून :  हो, अन आपण तसलं काही बोललो तर उगाच वांदे व्हायचे. (छातीला हात लावत)
साहेबांना पडद्यावर भेटण्याची उत्सुकता निर्माण झाल्याने मफलर गुंडाळत ते कोकणच्या माणसाच्या 
घरी निघून गेले.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!