यासंदर्भात जय महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मला प्रतिक्रियासाठी लाईव्ह कार्यक्रमातून अगदी अचानक कॉल आला.मला याची कसलीही कल्पना नव्हती.
देवेंद्रजी सरसंघचालकांना भेटल्यामुळे युतीचे सरकार येईल का?
युती बिघडवण्यात संजय राऊत कारणीभूत आहेत का?
अगदी अचानक विचारलेल्या अशा प्रश्नाना उत्तरे देताना खरेतर एखादा शब्द इकडचा तिकडे जाण्याची दाट शक्यता होती परंतु सुदैवाने मी व्यवस्थित उत्तरे दिली.
(पोस्ट सोबत चर्चेच्या व्हिडीओची लिंक जोडली आहे )
कदाचित काही उलटसुलट झाले असते तर चॅनलला काहीतरी खमंग मिळाले असते परंतु मी अडकलो असतो.
चॅनेलीय चर्चाचे स्वरूप बघितले तर या साधारणत: अशाच प्रकारच्या दिसून येतात.
नुपूर शर्मा सुद्धा अशाच जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. समोरील व्यक्ती भगवान शंकरांचा अपमानजनक उल्लेख करताना त्यांनी प्रत्युत्तरादाखल काही वक्तव्ये केली.
ज्यामुळे त्या अडचणीत आल्या. पक्षाने त्यांना निलंबित केले. परंतु त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
एखाद्या हिंदू ने स्वतः च्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करून परधर्म सहिष्णूता पाळायची का?
हिंदू धर्म परंपरा, देवी देवता, साधू संत यांच्याबद्दल चित्रपट, लिखाण, वक्तव्ये यांच्या माध्यमातून अ श्लाघ्य, अपमानजनक टीका टिप्पणी केली जाते. त्यावेळी परधर्मसहिष्णूता कुठे असते?
ज्यावेळी अकबरुद्दीन ओवेसी पंधरा मिनिट के लिए पुलिस हटादो असे खुले आव्हान देतो त्यावेळी कोणताही देश त्यांना कधीच समजून का सांगत नाही?
बाकी
यनिमित्ताने राजकीय पक्षाच्या मीडिया, सोशल मीडिया तील कार्यकर्तेसाठी एकच धडा लक्षात घेण्यासारखा आहे.
मीडिया, सोशल मीडिया वर आपापल्या पक्षाचे, नेत्याचे जीव तोडून काम करतो अन काही अडचणी निर्माण झाल्या की त्यांच्या तोंडी
बेबी चित्रपटातील डॅनी चे वाक्य असते.
अगर कुछ हो जाता हैं तो, अजय हमारा था ही नही...