सुशिक्षितांचा (?) अधर्म

0


#TCS Nashik News नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटले आहे की

व्यक्तीच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होणे म्हणजे शिक्षण.

 या व्याख्येमधून टागोरांनी शिक्षण क्षेत्राने उद्दिष्ट्य अतिशय समर्पक शब्दात सांगितले आहे. प्राथमिक शिक्षणात पायाभरणी करून  माध्यमिक शिक्षणात मुख्य संस्कार व्हावेत व उच्च शिक्षण घेताना हे उद्दिष्ट्य साध्य व्हावे जेणेकरून एका सदृढसंवेदनशील समाजाची निर्मिती होऊ शकेल. परंतु समाजातील वाढलेली असंवेदनशीलतागुन्हे बघता हे उद्दिष्ट्य साध्य करण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शिक्षण क्षेत्राची वाटचाल या दिशेने व्हायला हवी होतीमात्र दुर्दैवाने ती झाली नाही. परिणामी मोठमोठ्या पदव्या घेऊन व्यक्ती शिक्षित तर झाला मात्र सुशिक्षित झाला असे म्हणता येत नाही. नाशिक येथील बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये घडलेल्या घटना बघता शिक्षण व्यवस्थेतून सुसंस्कृतसंवेदनशील नागरिक निर्माण होत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सारासार विवेकापेक्षा संख्यावाढीचा धर्म जास्त प्रभावी ठरला. धर्मपालन हे आध्यात्मिक प्रगतीसाठी असावे की संख्या वाढवण्यासाठी ? आणि संख्या  वाढवून नेमके कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.  

#TCS Nashik controversy


धर्म आध्यात्मिक प्रगतीसाठी की संख्या वाढीसाठी ?

धर्म हा विषय तसा खूप गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असा असल्यामुळे त्याची चिकित्सा हा मोठा विषय आहे. परंतु सामान्यपणे आध्यात्मिकता हा धर्माचा पाया आहे. आणि ही अध्यात्मिकता प्रत्यक्ष आचरणात आणणे हे धर्माचे मुख्य उद्दिष्ट्य. अशाप्रकारे धर्म म्हणजे कर्तव्यपालन आणि आदर्श आचारसंहिता म्हटली पाहिजे. संताच्या वचनातून आणि जीवनचरित्रातून त्यांनी  जे जे भेटे भूत | ते ते माणिजे भगवंत हाच भक्तियोग निश्चित जाण माझा || इतका साधा सरळ आणि सोपा संदेश दिला आहे. तसेच वसुधैव कुटुंबकम् या दोन शब्दात धर्माचे सर्व सार सामावलेले आहे. धर्माने कधीही आक्रमणकारी नसावे आणि संख्यावाढ करण्याचे ध्येय असेल तर तिथे आध्यात्मिकता शून्य च समजली पाहिजे.  लौकिक आयुष्याची नश्वरता लक्षात घेऊन परमशक्तीमध्ये विलीन होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने साधना करावी. ज्ञानभक्ति व वैराग्याच्या मार्गाने जावे अशा प्रकारची शिकवन असेल तर अनायासे परमत आणि परधर्माविषयी आदर निर्माण होतो.  माझे मत खरे आहे तसेच समोरच्या मताचाही आदर करण्याची शिकवण धर्मामध्ये असली पाहिजे. भारतातील खंडन मंडन परंपराशास्त्रचर्चा प्रसिद्ध आहे. यामुळेच हिंदू धर्मात अद्वैतवादद्वैतवाद या सारखे विविध मतपरंपरा आहेत. अगदी ईश्वराचे अस्तित्व नाकाराणारा नास्तिकवाद सुद्धा आहे. ज्ञानभक्तिकर्म आणि योग असे विविध मार्ग आहेत. शैववैष्णवशाक्त्यगाणपत्य असे पंथसंम्प्रदाय आहेत. एकूणच असे म्हणता येईल कीआध्यात्मिक प्रगतीसाठी निरनिराळ्या मतांचा स्वीकार करण्याचा संस्कार या देशाच्या मातीत आहे आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये संख्यावाढ हा मुद्दाच उरत नाही. परंतु इतर धर्मामध्ये संख्यावाढीचे विशेष महत्व आहे. यासाठी संघटीत प्रयत्न केले जातात. कधी प्रलोभने दाखवून तर कधी जोरजबरदस्ती करून संख्यावाढीचे धेय साध्य केले जाते.

#TCS Nashik News


संविधान की धर्मग्रंथ ?

भारतात संसदीय लोकशाही आहे आणि आपण संविधानाच्या चौकटीचे पालन करतो. संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्याचा उद्देश्य अर्थातच व्यक्तिगत श्रद्धा आणि उपासनेसाठी आहे. परंतु दुर्दैवाने या हक्काचा गैरवापर करून संविधानाला आव्हान देण्याचा प्रयत्न होतो.  देशातील प्रत्येक नागरिकाला संविधान सर्वोच्च असले पाहिजे. किंबहुना संविधानातील तरतुदींचे पालन करण्याची शिकवण देणारा धर्म आवश्यक आहे. प्रत्येक धर्माच्या प्रार्थनास्थळामध्ये देशाची एकात्मता आणि अखंडतेची शिकवण देणे आवश्यक आहे. मात्र या देशात संविधान असताना त्याच्या समकक्ष धार्मिक कायदे मंडळ अस्तित्वात आहे. संविधान अगोदर की धर्मग्रंथ अगोदर या प्रश्नाचे उत्तर संविधान हेच असले पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. संविधानापेक्षा धर्मग्रंथ अधिक महत्वाचा वाटत असल्याने विविध प्रश्न निर्माण होतात.

#Nashik ITCompany Harassment Case


संख्यावाढ कशासाठी ?       

प्रत्येक नागरिकाला दिलेला मताचा अधिकार ही लोकशाहीने दिलेली सर्वात मोठी शक्ती आहे. लोकशाहीत सत्ताप्राप्तीसाठी बहुमत आवश्यक आहे आणि बहुमतासाठी संख्याबळ असणे आवश्यक आहे. बहुमताच्या जोरावर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आवश्यक दबावगट निर्माण होतो. हे सत्तासूत्र लक्षात घेऊनच संख्यावाढीचे संघटीत प्रयत्न केले जात असल्यास नवल नाही. आणि धार्मिक शिकवण असल्याशिवाय आपल्या धर्मीयांची संख्यावाढ करण्याचे प्रयत्न होऊ शकत नाही. यामध्ये पुण्य वगैरे प्राप्त करण्याची प्रेरणा असू शकते. परंतु यापेक्षा गंभीर मुद्दा आहे दबावगट निर्माण करण्याचा आहे. असे दबावगट हे कुठल्याही राज्यसंस्थेस गंभीर आव्हान निर्माण करू शकतात.     


अल्पसंख्य आणि बहुसंख्य  

जागतिक स्तरावर अनेक देशात बहुसंख्य असलेल्या धर्मीयाकडून अल्पसंख्य असलेल्या धर्मावर बंधने लादली जातात. अनेक देशात तर ईशनिंदेसारखा कायदा आहे. मात्र बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात अल्पसंख्य समाजाला मोठ्याप्रमाणावर सुविधा पुरवण्यात येतात. विरोधाभास म्हणजे हिंदू धर्मातील शिक्षित व्यक्ती धर्मअध्यात्मपरंपरा यांचे पालन म्हणजे गावंढळपणा समजतो. वेळप्रसंगी शिक्षित हिंदू स्वतःच्या धर्माची टिंगलटवाळी करेल परंतु परधर्माचीप्रशंसा करतो. तर इतर धर्मातील व्यक्तींची धर्मनिष्ठा जराही ढळत नाही. याउलट तो अधिक प्रखरतेने धर्मतत्वाचा अनुनय करतो. स्वतःच्या धर्माचे पालन करण्यापेक्षा परधर्माचा द्वेष करण्यात अधिक सक्रीय असतो. नाशिक येथील प्रकरणानंतर ही वस्तुस्थिती असल्याचे दिसून येते.

कुठल्याही धर्मातील नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे कीधर्म हा केवळ आणि केवळ आध्यात्मिक उन्नती साठी आवश्यक असणारी बाब आहे. देशहिताला बाधा पोहोचवणाऱ्या कुठल्याही धर्मापेक्षा संविधान श्रेष्ठ आहे. आणि म्हणून देशहिताच्या विरोधी असणाऱ्या तत्वांचा आपण प्रखर विरोध केला पाहिजे. प्रत्येक नागरिकाची आणि विशेषतः शिक्षित नागरिकांची ही जबाबदारी आहे कीआपण स्वतःच्या आचरणातून हा आदर्श निर्माण करावा. तरच आपण खऱ्या अर्थाने भविष्याचे निर्माण करू शकू.  

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!